सोनगीरनजिक पहाटे दरोडा तीन लोकांना दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:30 IST2017-12-11T13:42:41+5:302017-12-11T18:30:18+5:30

पहाटेचा थरार : अडीचशे रुपये हिसकाविले

Sonarginese robbery hurt three people | सोनगीरनजिक पहाटे दरोडा तीन लोकांना दुखापत

सोनगीरनजिक पहाटे दरोडा तीन लोकांना दुखापत

ठळक मुद्देसोनगीरनजिक महामार्गावरील हॉटेलवरचा थरारबळजबरीने हिसकाविले खिशातून पैसेसोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील सोनगीरनजिक हॉटेलवर सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी पहाटे दरोडा टाकला़ मालकावर हल्ला चढवत त्यांच्या खिशातून अडीचशे रुपये हिसकावून नेले़ झटापटीत ३ जणांना दुखापत झाली़ सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते़ 
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर धुळे तालुक्यातील सोनगीर हद्दीत असलेल्या सरवड गावालगत असलेल्या हॉटेल भाऊ येथे सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकला़ यात ३ ते ४ जणांचा दरोडा टाकण्यात समावेश होता़ दरोडेखोरांनी हॉटेल मालकावर हल्ला चढवत हॉटेलमधील गल्ल्यातील सुमारे ३ हजार रुपये काढले़ याशिवाय त्यांनी हॉटेल मालकाच्या पॅन्टच्या खिशातून २५० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले़ या झटापटीत ३ जण जखमी झाले आहेत़ घटनेचे गांभिर्य पाहून दरोडेखोरांनी घटनास्थळांवरुन पळ काढला़ याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते़ 

Web Title: Sonarginese robbery hurt three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.