मुलाने केला आईचा दगडाने ठेचून खून

By Admin | Updated: May 22, 2017 15:06 IST2017-05-22T15:06:29+5:302017-05-22T15:06:29+5:30

टेंभा प्र.वारसा शिवारातील घटनेनंतर संशयित आरोपी मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

The son had murdered his mother with a stone | मुलाने केला आईचा दगडाने ठेचून खून

मुलाने केला आईचा दगडाने ठेचून खून

 धुळे,दि.22- साक्री तालुक्यातील टेंभा प्र. वारसा येथे मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 12 वाजेपूर्वी घडली. या प्रकरणी मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अहिलुबाई दुर्जन देसाई (50) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या शेतातील घरात एकटय़ाच राहतात. रविवारी दुपारी मुलगा रायमल दुर्जन देसाई याने तिच्या डोक्यावर दगड टाकून खून केला. याप्रकरणी सायमल देसाई यांच्या फिर्यादीवरुन पिंपळनेर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी रायमल याला ताब्यात घेतले आहे. खुनाचे कारण समजु शकलेले नाही.

Web Title: The son had murdered his mother with a stone