समाजाने गुणवंताचे मनोबल उंचवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:03 IST2019-07-29T23:03:36+5:302019-07-29T23:03:52+5:30
गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांचा सूर : विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील पदाधिकायांचा सन्मान

समाजाने गुणवंताचे मनोबल उंचवावे
गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत संजय बागूल, मोहन हिवरकर, देवेंद्र शेरेकर, मोतीलाल वडनेरकर आदी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरावी. तर समाजानेही गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे मनोबल उंचविण्यासाठी सहकार्य करावे असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.
श्रीसंत नरहरी महाराज प्रतिष्ठान व आॅल इंडिया फेडरेशन तर्फे समाजातील सर्व शाखीय महापौर, नगरसेवक, स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यात वरील सूर उमटला.
बाळकृष्ण लॉन्स नकाणे रोड येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अहमदाबाद सुवर्णकार समाजाचे विश्वस्त संजय बागूल होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, राष्टÑीय अध्यक्ष मोहन हिवरकर, डॉ. देवेंद्र शेरेकर, मोतीलाल वडनेरकर, अनिल सोनार, अजय नाशिककर, रवींद्र मैद यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारस देवपूरकर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होणाºया भाग्यश्री विसपुते यांच्यासह नगरसेवक, दहावी, बारावीतील गुणवंताचा महापौर चंद्रकांत सोनार व इतरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पारस देवपूरकर, रमेश पोतदार, डी.बी. सोनार, संगीता विसपुते, शशिकला तारखेडकर, मीना रनाळकर, मेघा देवपूरकर, कविता सोनार, धनराज भामरे, अरूण विसपुते, राकेश गाळणकर, एन.पी.विसपुते, प्रमोद मुंडके, महेंद्र सोनार आदींनी परिश्रम घेतले. या सत्कार