जिल्ह्यातील आतापर्यंत ११९४ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:30 IST2020-05-09T13:28:55+5:302020-05-09T13:30:43+5:30
शुक्रवारी आढळले १८ रूग्ण

dhule
धुळे- मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र शुक्रवारी एकाच दिवसात १८ रूग्ण पॉजीटीव्ह आढळल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. धुळे शहरात १७ नवे रूग्ण आढळले आहेत तर अमळनेर येथील एका रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धुळे शहरातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ११९४ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.