घाण पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:36 IST2019-07-30T21:36:09+5:302019-07-30T21:36:09+5:30
शहर वाहतूक नियंत्रण शाखेसमोरील प्रकार : नागरिकांना सोसावा लागला त्रास

घाण पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी
धुळे : गटारीतील घाण पाणी रस्त्यावर आल्याने, शहर वाहतूक शाखेसमोर मोठ्या प्रमाणात घाण निर्माण झालेली होती. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती.
शहरात सोमवार रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान बसस्थानकाकडून जेलरोडकडे जाणाºया गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने, गटारीतील पाणी शहर वाहतूक शाखेसमोरील रस्त्यावर आले. रस्त्यावर सर्वत्र घाण पाणी असल्याने, या भागातून जातांना नागरिकांना बरीच अडचण येत होती. तसेच दुर्गंधीही येत होती. एकीकडे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतांना दुसरीकडे मात्र रस्त्यावर साचलेले घाण पाण्याचा निचरा करण्याकडेही दुर्लक्ष झाल्याने, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.गटार नियमित साफ केली असती, तर ही परिस्थिती आलीच नसती, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
*नियमित स्वच्छता झाली पाहिजे*
बसस्थानक परिसरात असलेले काही विक्रते गटारीतच कचरा, प्लॅस्टिक टाकत असतात. त्यामुळे गटार तुडुंब भरत असते. थोडाही पाऊस झाला की गटारीचे पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे या परिसरातील गटारीची नियमित स्वच्छता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.