झोपडपट्टी नियमानुकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:18+5:302021-01-15T04:30:18+5:30
धुळे : महानगर हद्दीतील आझाद नगर, भोईवाडा, अजमेरा नगर, मुस्लीम नगर, जनता सोसायटी, गजानन काॅलनी परिसरातील झोपडपट्टी व वसाहतींना ...

झोपडपट्टी नियमानुकूल
धुळे : महानगर हद्दीतील आझाद नगर, भोईवाडा, अजमेरा नगर, मुस्लीम नगर, जनता सोसायटी, गजानन काॅलनी परिसरातील झोपडपट्टी व वसाहतींना नियमानुकूल करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरी मुख्तार कसिम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
मनपाने महानगरात
धुरळणी करावी
धुळे: हिवाळा असल्याने शहरासह परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील दाट लोकवस्तीतच नव्हे तर काॅलनी परिसरातदेखील डासांचे प्रमाण अधिक आहे. विरळ काॅलनी परिसरात मोकळे प्लाॅट आणि मैदानांमध्ये साचलेल्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढत आहे. उपाययोजना म्हणून महापालिकेने धुरळणी व फवारणी करण्याचे काम हाती घेतले आहे.
वाहनांवरील कर्णकर्कश
हॉर्नमुळे होतोय त्रास
धुळे : शहरातील साक्रीरोडवर रोज सायंकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास दुचाकीस्वाराकडून विशेष करून बुलेटचालकांकडून ध्वनी प्रदूषण करणारे कर्णकर्कश हाॅर्न बसविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पाेलीस अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ज्योतिषशास्त्री
परीक्षेत उत्तीर्ण
धुळे : महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या ज्योतिषशास्त्री परीक्षेत सुनंदा देवीदास बागुल या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून, धुळे केंद्रात प्रथम आल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे संजीव जोशी, ए.व्ही. जोशी, प्रभावती गणेश पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.
गारठा पुन्हा वाढला
धुळे : शहराचे तापमान पुन्हा घसरले आहे. मकर संक्रांतीला शहराचे तापमान ९ से.वर पोहाेचले. पहाटे हवेत गारठा होता. दिवसभर थंड वारा सुरू होता. सायंकाळी पाच वाजतापासून हवेत गारठा जाणवू लागला होता.