चप्पल गोडावूनला आग, नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:04 IST2018-12-16T12:02:12+5:302018-12-16T12:04:32+5:30
रात्रीची घटना : ८० फुटी रोड परिसर

चप्पल गोडावूनला आग, नुकसान
ठळक मुद्देचप्पल गोडावूनला आगहजारो रुपयांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील ८० फुटी रोडवरील चप्पल गोडावूनला शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला मिळताच आग विझविण्यासाठी बंब दाखल झाला होता़ पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती़ तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ आगीचे कारण अस्पष्ट आहे़ दरम्यान, या आठवड्यात आगीच्या दोन - तीन घटना घडल्या आहेत़ या भागातील नागरीकांनी गर्दी केली होती़