सहा तरुणांची सैन्यदलात भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:38 IST2020-03-06T12:37:40+5:302020-03-06T12:38:07+5:30
नगाव : गावातून काढली मिरवणूक

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धमाणे : नगाव येथील गंगामाई वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा विद्यार्थ्यांची एकाच वेळेस भारतीय सैन्यामध्ये निवड झाली. निवड झालेल्या तरुणांमध्ये चार तरुण नगाव येथील तर दोन तरुण कापडणे येथील आहेत. गुरुवारी सायंकाळी या चारही तरुणांची नगाव गावात मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
अतिशय सामान्य कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. निवड झालेल्या तरुणांमध्ये नगाव येथील रोहित गटलू पाटील, मनोज प्रल्हाद पाटील, राहुल विलास पाटील, चेतन प्रविण भामरे तर कापडणे येथील अजय अरुण चौधरी व योगेश संभाजी पाटील या तरुणांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेचा नुकताच निकाल घोषित झाला यात सदर तरुणांना एकाच वेळी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना राजेंद्र सिंग, प्राचार्य पी.एम. पाटील, सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या तरुणांचे गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे सचिव मनोहर भदाणे चेअरमन व जि.प. सदस्य राम भदाणे, सरपंच ज्ञानज्योती भदाणे तसेच कापडणे येथील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.