तब्बल सहा रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:41 IST2020-08-06T14:41:16+5:302020-08-06T14:41:39+5:30
धुळे - बुधवार मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटे पर्यंत तब्बल सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांवर हिरे शासकीय वैधकीय ...

dhule
धुळे - बुधवार मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटे पर्यंत तब्बल सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांवर हिरे शासकीय वैधकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. मृतांमध्ये धुळे शहरातील शनी नगर येथील ४४ वर्षीय पुरुष, गोकुळ नगर येथील ६५ वर्षीय पुरुष, देवपूर येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील ८० वर्षीय पुरुष, देऊर येथील ६५ वर्षीय व कुसुंबा ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील १३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.