सहा महिन्यांपासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:37 IST2019-08-06T21:37:08+5:302019-08-06T21:37:43+5:30

धुळे : खान्देश ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन

For six months, the wages of the villagers were exhausted | सहा महिन्यांपासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकले

सहा महिन्यांपासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकले

धुळे : ग्रामरोजगार सेवकांचे मार्च ते आॅगस्ट २०१९ असे एकूण सहा महिन्यांचे मानधन थकले असून, ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी खान्देश ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेतर्फे उपजिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामरोजगार सेवक हे अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करतात. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावे लागत असते. ते सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांना दरमहा मानधन न मिळाल्याने आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन मिळत नसल्याने काय करावे हे त्यांना सूचत नाही. वेळेवर मानधन मिळत नसतांनाही ते इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावित आहे. 
दरम्यान संबंधितांना मानधन देण्याचे आदेश देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील व इतरांच्या स्वाक्षºया आहेत. 
कामकरूनही  मजुरी देण्यास टाळाटाळ
धुळे-येथील वनविभागातील धुळे वनक्षेत्रात बोरविहिर रोपवाटिकेत रात्रपाळीत कामाला असलेले शंकर भिका लोधी (रा.धुळे) हे १९९३ पासून वनविभागामध्ये संरक्षण मजूर म्हणून कामाला आहेत. त्यांना एप्रिल ते आॅगस्ट २०१९ पर्यंतची मजुरीची रक्कम देण्यात आलेली नाही. मजुरी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे त्यांना अवघड झालेले आहे. मागील काळाची सर्व मजुरी १३ आॅगस्टपर्यंत न मिळाल्यास १४ आॅगस्टपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी वनविभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला.

Web Title: For six months, the wages of the villagers were exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे