धुळ्यात नियम तोडणाऱ्या तरूणांना बसला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:06 IST2020-03-25T12:05:48+5:302020-03-25T12:06:12+5:30
साठेबाजी करणे पडू शकते महागात : घराबाहेर निघू नका, घरातच थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन

धुळ्यात नियम तोडणाऱ्या तरूणांना बसला चोप
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी सोमवारी संचार बंदी लागु केली आहे़ नागरिकांना वेळोवेळी घरात बसण्याचे आवाहन केले जात असतांना आदेशाचे उल्लंघन करीत शहरात मनोरंजनासाठी शहरात मोटारसायकलवर फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या तरूणांना मंगळवारी पोलिसांनी चांगला चोप दिला़
शासनाने जाहीर केलेल्या संचार बंदी लागु केली आहे़ या काळात नारिकांना जीवनावश्यक वस्तुंच्या खेरदीसाठी वेळ देण्यात आला आहे़ मात्र देण्यात आलेला वेळ व संचार बंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर बिनस्थान फिरणाºया दुचाकीस्वारांना भर उन्हात पोलिसांचा चांगलाचा मार खावा लागला़ तर संचारबंदीचा आदेश न पाळल्याने उन्हात बैठका माराव्या लागल्यात़ तर काहीच्या दुचाकीची हवा पोलिसांनी काढल्याने धक्के मारून दुचाकी घराकडे घेऊन जावी लागली होती़ दरम्यान शहरातील चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़
दिवसा रस्त्यावर शुकशुकाट
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी आवाहन करण्यात आलेले असतांना मंगळवारी सकाळी ८ वाजता भाजीपाला, जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी आग्रारोड व पाचंकदील परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती़ त्यामुळे गर्दी पागविण्यासाठी पोलिसांना कठोर भुमिका घ्यावी लागली होती़ त्यांनतर तासाभरात गर्दी कमी झाली़
पेट्रोल पंप दुपारी बंद
सकाळी पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी दिसुन आली मात्र दुपारी दोन वाजेनंतर पेट्रोल पंप बंद असल्याने परिसरात शुकशुकाट दिसुन आला़ तर दुचाकी, चारचाकी किंवा खाजगी वाहने देखील रस्त्यावर फिरत नसल्याने गल्ली बोळातील रस्ते ओस पडले होते़
साठवणुक केल्यास कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहेत. या आदेशातून जीवनावश्यक वस्तू गहू तांदूळ, डाळ, कडधान्य, खाद्यतेल , दूध, बेकरी पदार्थ, फळे व भाजीपाला आदी वस्तुंना वगळले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुरेल इतका अन्नधान्य साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच शासनाने एप्रिल मे व जून महिन्याचे धान्य एकदाच वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व रास्त भाव दुकानदार, धान्याच्या घाऊक व अर्ध घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना, खाद्यतेल व डाळींचे व्यापारी व इतर जीवनावश्यक वस्तूचा व्यापार करणाºया सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे़ या काळात कोणत्याही प्रकारचे साठेबाजी करू नये. वस्तूंचे कृत्रिम भाव वाढवून नफे खोरी करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. साठवणूक केल्यास किंवा अवाजवी भावात विकणाºयाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाईचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिला.