बंद पडलेला लाखो रुपयाचा पाणी फिल्टर प्लांट तात्काळ सुरु करा, ग्रामस्थांची धनुर ग्रामसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST2021-09-04T04:42:41+5:302021-09-04T04:42:41+5:30

घरकुल वाटपाचा प्रश्न ऐरणीवर ग्रामसभेत घरकुल यादी संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनासमोर खडा सवाल उभा केला यावेळेस ग्रामस्थांनी कैफियत मांडली ...

Shut down water filter plant worth lakhs of rupees should be started immediately, villagers demand in Dhanur Gram Sabha | बंद पडलेला लाखो रुपयाचा पाणी फिल्टर प्लांट तात्काळ सुरु करा, ग्रामस्थांची धनुर ग्रामसभेत मागणी

बंद पडलेला लाखो रुपयाचा पाणी फिल्टर प्लांट तात्काळ सुरु करा, ग्रामस्थांची धनुर ग्रामसभेत मागणी

घरकुल वाटपाचा प्रश्न ऐरणीवर

ग्रामसभेत घरकुल यादी संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनासमोर खडा सवाल उभा केला यावेळेस ग्रामस्थांनी कैफियत मांडली की जे जे गरजू ग्रामस्थ आहेत अशा लोकांनाच घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा बोगस लाभार्थ्यांना लाभ देऊ नये अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे घरकुल वाटपात पारदर्शकता आणावी घरकुल वाटपाच्या ''ब'' यादीत 170 लाभार्थ्यांची नावे आहेत ती यादी अंतिम टप्प्यावर असून आता ''ड'' यादी तयार होत असून यात संशयाची पाल चुकचुकते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सदर ग्रामसभेच्या उपस्थितीत सरपंच सौ.सत्यभामाताई शिंदे ,उपसरपंच सौ.कमलताई पटेल, माजी उपसरपंच युवराज चौधरी, ग्रा.पं.सदस्यांपैकी मालुबाई शिंदे, लताबाई चौधरी, माधुरी शिंदे, प्रज्ञा भामरे, धर्मराज शिंदे, विजय चौधरी , ग्रामसेवक सुरेखा ढोले ,ग्रामरोजगारसेवक श्री. राजेंद्र वाघ सर , महिला वर्ग, गावातील शासकीय -निमशासकीय संस्थांचे पदाधिकारी ,तर धनुर ग्रामस्थांपैकी अरूण नारायण शिंदे, अशोक दादा शिंदे, डॉ. सुरेश महादू भामरे,विजय आनंदा भामरे,निंबा आबा चौधरी, रावण भिका खैरनार,बंडू चौधरी,संदीप फौजी,भाऊसाहेब भाईदास पाटील,अनिल सैंदाणे,अनिल खैरनार,रमेश पंडित चौधरी, भटु दत्तात्रय खैरनार,गोरख माळी, चिंधा सैंदाणे, दत्ता जाधव,गुलाब जाधव,आत्माराम चौधरी,मयुर अर्जुन शिंदे, धनराज केशव पाटील,आनंद शिंदे, सुरेश विनायक पाटील, चिंदा सैंदाणे सुरेश भामरे , सुरेश चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित .

Web Title: Shut down water filter plant worth lakhs of rupees should be started immediately, villagers demand in Dhanur Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.