लोकमत आॅनलाईनधुळे : जम्मू-काश्मिर राज्यात पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्ह्यात तीव्र निषेध होत आहे. शनिवारी शिरपूर, शिंदखेडा, साक्री शहरांसह त्या तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी बंद पाळण्यात येऊन या भ्याड घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ंिशंदखेडा येथे भव्य मूकमोर्चाही काढण्यात आला.तिन्ही तालुक्यांत कडकडीत बंदजिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, पिंपळनेर, दोंडाईचा आदी बहुतांश ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्यात आले होते. सामूहिक सभा घेण्यात येऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावोगावी या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.शिंदखेडा येथे शहरातून अभूतपूर्व असा मूकमोर्चा काढण्यात आला. त्यात आबालवृद्ध पुरूष-महिला सहभागी झाले होते. गांधी चौकात समारोप झाल्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिरपूर येथे सर्व व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात येऊन हल्ल्याच्या घटनेचा निषेध व धिक्कार करण्यात आला.जिल्हा कॉँग्रेसतर्फे शहीदांना श्रद्धांजलीशहरात जिल्हा कॉँग्रेसतर्फे शनिवारी सकाळी कॉँग्रेस भवनात या हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, महानगर अध्यक्ष युवराज करनकाळ, जि.प. सभापती मधुकर गर्दे, माजी खासदार बापू चौरे, रमेश श्रीखंडे, माजी आमदार के.सी. खोपडे आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिरपूर, शिंदखेड्यासह ठिकठिकाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:54 IST
शिंदखेडा येथे भव्य मूकमोर्चा
भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिरपूर, शिंदखेड्यासह ठिकठिकाणी बंद
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्रीत कडकडीत बंदशिंदखेड्यात मूकमोर्चाद्वारे भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेधजिल्हा कॉँगे्रसतर्फे कॉंग्रेस भवनात सभा घेऊन श्रद्धांजली