राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता श्रध्दा सोनगडेंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:16 IST2018-12-07T21:15:08+5:302018-12-07T21:16:17+5:30
शिरपूर : एच़आऱपटेल कन्या शाळेची विद्यार्थींनी

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता श्रध्दा सोनगडेंची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा सुरेश सोनगडे हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून ती महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धा बारामती येथे घेण्यात आली. त्यात शाळेचा संघ सहभागी झाला होता़ त्यात श्रध्दाचा उत्कृष्ट खेळामुळे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. श्रध्दाने उत्कृष्ट चढाई व पकड करून चांगला खेळ केल्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. श्रध्दा ही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिला प्रशिक्षक भूषण चव्हाण, क्रीडाशिक्षक पी.बी.धायबर, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा कबड्डी अससोसिशनचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, तपनभाई पटेल, प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य आर.बी.पाटील यांनी कौतुक केले़