धुळे तालुक्यात ‘युरिया’चा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:42 IST2020-07-24T22:41:51+5:302020-07-24T22:42:12+5:30
राम भदाणे : शेतकऱ्यांना दिला जातोय फुकटचा सल्ला

धुळे तालुक्यात ‘युरिया’चा तुटवडा
धुळे : धुळे तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण होऊ पहात आहे़ त्याअनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर खते उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी केली आहे़ दरम्यान, काही कृषी सेवा केंद्राकडून शेतकºयांना पर्यायी खतांचा फुकटचा सल्ला दिला जात असल्याचा आरोपही भदाणे यांनी केला आहे़
धुळे तालुक्यासह जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिकांची पेरणी झाली असुन पिके जोमाने शेतात डोलत आहे. पिकांना युरिया खताची मात्रा देण्याची गरज असताना मात्र धुळे तालुक्यातील कृषी केंद्रासह शहरातीत कृषी केंद्रांमध्ये युरीया खताचा साठा संपला आहे असे सांगण्यात येत आहे़ ऐन वेळेवर युरिया मिळत नसल्याने शेतकºयांना पर्यायी खतांचा फुकटचा सल्ला कृषी सेवा केंद्र संचालकांकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे जे खत आहेत त्याचा देखिल साठा संपण्याचा धाक दाखवत आहे. युरीयाची १ बॅग घेण्यासाठी इतर खतांच्या ६ बॅगा घ्यावा लागत आहेत. तरी देखील युरिया चढ्यादराने मिळत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रामदादा भदाणे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे युरिया खत तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली आहे व चढ्यादराने खत विकणाºया कृषी केंद्रावर व खत असून न देणाºयांवर कडक कारवाईची मागणी भदाणे यांनी केली आहे.
खरीप हंगामातील कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला या पिकांचा हंगाम सुरू आहे. पावसाचे प्रमाण साधारण असले तरी सर्व पिके वाढीला लागली आहेत. पिकांच्या योग्य वाढीसाठी त्यांना खतं देण आवश्यक आहे. कपाशीला खताची पहिली मात्रा मिळाली असुन दुसºया मात्रेत खत देण्यासाठी खतांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, अशातच धुळे तालुक्यासह कृषी केंद्रात युरिया खतांचा साठाच संपल्याने आता वेळेवर शेतकºयांची धावपळ होत आहे. युरीया नसल्याचे सांगून अन्य खत फॉस्परस, मॅग्नेशीयम, पोटॅश, डी.ए.पी. बरोबरच अन्य खत घेण्याचा सल्ला कृषी केंद्र संचालक देत आहेत़ ६ बॅगांमागे १ युरीयाची बॅग ती पण चढ्यादराने देत आहे. अशी खंत शेतकºयांनी बोलवून दाखवली आहे. तसेच शेतकºयांना कृषी केंद्र संचालक इतर खते देखिल संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती घालुन खते विक्री करत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे व भरारी पथके नेमून संबंधीतांनावर कारवाई करावी, अशी मागणी भदाणे केली आहे.
शेतकºयांपुढे समस्याच
प्रत्येक वर्र्षी हंगामाच्या सुरवातीला मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध असतो. परंतु जेंव्हा पिकांना आवश्यकता भासते त्याचेळेस दुकानातील युरिया संपल्याचे नेहमीचेच झाले आहे. कोरोनाच्या काळात कृषी साहित्याबरोबर बी-बियाणे, खतं अणि मजुरांची मजुरी वाढली आहे. त्यात आता खतांचा पुन्हा तुटवडा निर्माण केला जात असल्याने शेतकºयांंनी काय करावे? असा मोठा प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे.