नंदुरबारला 811 जणांकडून वीज कंपनीला ‘शॉक’
By Admin | Updated: March 25, 2017 17:36 IST2017-03-25T17:36:26+5:302017-03-25T17:36:26+5:30
गेल्या वर्षभरात तीन पटीने वीज चोरी वाढल्याने वीज कंपनीलाच आर्थिक फटका बसून मोठा शॉक दिला जात आहे.

नंदुरबारला 811 जणांकडून वीज कंपनीला ‘शॉक’
नंदुरबार जिल्ह्यात वीज चोरी तिपटीने वाढली
नंदुरबार : जिल्ह्यामध्ये वीज चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून वर्षभरात 811 ठिकाणी वीज चोरी पकडण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात तीन पटीने वीज चोरी वाढल्याने वीज कंपनीलाच आर्थिक फटका बसून मोठा शॉक दिला जात आहे.
2015-2016 या वर्षात नंदुरबार विभागातर्फे 254 वीज चो:यांची प्रकरणे पकडण्यात आली होती़ यातील 145 ग्राहकांकडून 19 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी वसूल केली होती़ यंदा 2016-2017 या आर्थिक वर्षात वीज चो:यांच्या प्रकणांमध्ये तीनपटीने वाढ होत तब्बल 811 वीज चोरीचे प्रकरणे पकडण्यात आली आह़े यातून आतार्पयत 382 ग्राहकांकडून 25 लाख रुपयांची वसुली करण्यात आली़