शिवसेनेचा एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:58+5:302021-06-06T04:26:58+5:30

शिंदखेडा येथे घेण्यात आलेली बैठक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ...

Shiv Sena's resolve to plant one lakh trees | शिवसेनेचा एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

शिवसेनेचा एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

शिंदखेडा येथे घेण्यात आलेली बैठक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिवसेनेच्या विधानसभा संघटकपदी गणेश परदेशी, तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शिंदखेडा शहरप्रमुख संतोष देसले, शिरपूर शहरप्रमुख देवेंद्र पाटील या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तेथे शाखा हे अभियान सुरू करून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवू असे आश्वासन दिले. यावेळी मंगेश पवार, विश्वनाथ पाटील, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंग राजपूत, सर्जेराव पाटील, तालुका प्रमुख श्री. अत्तरसिंग पावरा, छोटू पाटील, गणेश परदेशी, ईश्वर पाटील, संतोष देसले, देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके म्हणाले की, पद येणे-जाणे ही निरंतर प्रक्रिया आहे. परंतु पक्ष संघटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपसी मतभेद बाजूला ठेवून पक्षासाठी सगळ्यांनी एक दिलाने, एक जोमाने काम करावे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यासाठी आजपासूनच कामाला लागावे.

यावेळी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, भाईदास पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, दीपक चोरमले, उपजिल्हा संघटिका विनाताई वैद्य, तालुका समन्वयक विनायक पवार, युवासेनेचे प्रदीप पवार, विजय पाटील, अनिकेत बोरसे, शैलेश सोनार, राकाशेठ रूपचंदाणी, सागर देसले, नंदकिशोर पाटील, चंद्रसिंग ठाकूर, प्रताप सिसोदे, परमेश्वर पाटील, एस.डी. पाटील, वासुदेव शिंदे, रावसाहेब सैंदाणे आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's resolve to plant one lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.