देवपुरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना उठवा शिवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST2021-06-26T04:25:07+5:302021-06-26T04:25:07+5:30

देवपूर भागातील रस्त्यावर सुमारे दोनशे ते तीनशे विक्रेते अनेक महिन्यांपासून व्यवसाय करीत आहे. त्यामुळे येथील बराच भाग व्यावसायिकांनी व्यापून ...

Shiv Sena raises unauthorized vegetable sellers in Devpura | देवपुरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना उठवा शिवसेना

देवपुरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना उठवा शिवसेना

देवपूर भागातील रस्त्यावर सुमारे दोनशे ते तीनशे विक्रेते अनेक महिन्यांपासून व्यवसाय करीत आहे. त्यामुळे येथील बराच भाग व्यावसायिकांनी व्यापून घेतलेला आहे. भाजी खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या मध्यभागी वाहने लावतात. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहतुकीची कोंडी होतेे. याच भागात शाळा, महाविद्यालय, कोचिंग व अन्य क्लास तसेच खासगी व सरकारी दवाखाने देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची कायमस्वरूपी वर्दळ असते. या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडी व कर्कश आवाजाने स्थानिक नागरिकांना त्रासाला सामाेरे जावे लागत आहे. येथील व्यावसायिकांना मनपाने कायमची जागा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी येथील नवरंग पाण्याच्या टाकीजवळ भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगर प्रमुख ललित माळी यांनी केली आहे.

Web Title: Shiv Sena raises unauthorized vegetable sellers in Devpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.