Shiv Sena Help Center for farmers launched at Sakri | साक्री येथे शेतकऱ्यांसाठी शिवसेनेतर्फे मदत केंद्र सुरू
Dhule

साक्री : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुका शिवसेनेतर्फे शेतकºयांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे व आमदार मंजुळा गावित यांनी पाहणी दौरा करतेवेळी लवकरच शेतकरी मदत केंद्र उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शेतकºयांच्या मदतीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे अडचणीत असलेल्या शेतकºयांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासमवेत तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली होती. त्यावेळी शेतकºयांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पालकमंत्र्यांचा निदर्शनास आणून दिले होते.
पीक विमा योजना अंतर्गत तसेच सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. कृषी विभाग व महसूल खात्याच्या संयुक्त विद्यमाने हे पंचनामे होत असतांना विमा कंपन्यांकडून शेतकºयांचे अर्ज भरून घेतले जात होते. यामुळे शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत होता. या सर्व शेतकºयांना मदत मिळावी तसेच कोणी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. यासाठी पक्षाचे तालुकाप्रमुख विशाल देसले यांनी साक्री येथील संपर्क कार्यालयाच्या जवळ मदत केंद्र सुरू केले आहे. या केंद्राद्वारे शेतकºयांची माहिती संकलित करून ते शासनाकडे पाठविण्यात येणार असून शेतकºयांना त्यामुळे मदत मिळू शकणार आहे.
येथील माहिती संकलन करण्याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भूपेश शहा, विधानसभा संघटक पंकज मराठे, पिंपळनेर येथील दत्त गुरव, महिला आघाडीच्या कविता क्षीरसागर, साक्री शहर अध्यक्ष बंडू गीते, किशोर वाघ, भरत जोशी, बाळा देवरे, महेश खैरनार, रवींद्र खैरनार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena Help Center for farmers launched at Sakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.