शेतीसाठी विजेचे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:05 IST2020-02-25T12:05:14+5:302020-02-25T12:05:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : तालुक्यातील बोरीस, चिंचखेडे, कूळथे, चिंचवार, फागणे, निमडाळे, कूंडाणे या गावांसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विज ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील बोरीस, चिंचखेडे, कूळथे, चिंचवार, फागणे, निमडाळे, कूंडाणे या गावांसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विज पंपांना विज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मपर नादुरुस्त आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली असून दुरुस्तीचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे़
पक्षाचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनासह महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देवून ही मागणी केली़
ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने विज पंपांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे़ त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना वेळापत्रकानुसार पाणी देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़ ग्रामीण भागात वारंवार विज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ त्यामुळे ट्रान्सफॉर्मर त्वरीत दुरुस्त करुन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी करीत दोन दिवसात दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा जिल्हाप्रमुख माळी, सुदर्शना पाटील, विलास चौधरी, नेश देसले यांच्यासह शेतकºयांनी दिला आहे़