सत्तेसाठी शिवसेनेने विश्वासघात केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:34 IST2019-12-17T14:33:59+5:302019-12-17T14:34:24+5:30
संगमा चौकातील रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी सुभाष भामरे यांची टीका

सत्तेसाठी शिवसेनेने विश्वासघात केला
आॅनलाइन लोकमत
धुळे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र सत्ता लालसेपोटी शिवसेनेने विश्वासघात केला अशी टीका माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केली.
शहरातील संगमा चौकातील प्रभाग क्रमांक १६ मधील धान्य गोडावून ते सुरत बायपास दरम्यानच्या मॉडेल रस्ता कामाचे भूमिपूजन रविवारी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, नगरसेविका योगिता बागूल, प्रशांत बागूल, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.
डॉ. सुभाष भामरे पुढे म्हणाले की, मनपात सत्ता स्थापन झाल्यावर विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. त्यांनी मागणी पूर्ण करीत त्यातूनच १२ कोटी रूपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक हरिषचंद्र लोंढे यांनी केले. कार्यक्रमाला विजय पाच्छापूरकर, शितल नवले, बी.डी. सूर्यवंशी, अर्जुन पवार, प्रशांत मोरे, अलका पाटील, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.