धुळे शहरासह जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह, तरूणांनी काढली दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:11 IST2020-02-19T12:11:31+5:302020-02-19T12:11:51+5:30
रॅलीमध्ये अनेकांचा सहभाग, सर्वत्र भगवेमय वातावरण

धुळे शहरासह जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह, तरूणांनी काढली दुचाकी रॅली
आॅनलाइन धुळे
धुळे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरासह जिल्ह्यात उत्साहाने साजरी होत आहे. त्यानिमित्त सर्वत्र उत्साह, आनंदाचे वातावरण आहे. शहराच्या सर्वच भागात, प्रमुख चौकात भव्य भगवे ध्वज लावण्यात आल्याने, अवघे शहर भगवामय झालेले आहे.
शिवजयंतीनिमित्त अनेक शिवप्रेमींनी सकाळी पारोळा, तसेच मालेगाव रोडवर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन केले. त्यानंतर तरूणांनी दुचाकीला भगवेध्वज लावून दुचाकी रॅली काढली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. दरम्यान शिवतीर्थवर अभिवादानासाठी शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. धुळे शहरात दुपारी व सायंकाळी भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.