नेर येथे शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:46 IST2020-02-20T12:46:25+5:302020-02-20T12:46:58+5:30
नेर : धुळे तालुक्यातील नेर येथे शिवजयंत्ती निमित्ताने समस्त नेर ग्रामस्थं व राजे प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवजयंती बुधवारी उत्साहात साजरी ...

dhule
नेर : धुळे तालुक्यातील नेर येथे शिवजयंत्ती निमित्ताने समस्त नेर ग्रामस्थं व राजे प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवजयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम सकाळी १० वाजता नेरचे सरपंच शंकरराव खलाणे यांच्या हस्ते गांधी चौकात शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील सर्व तरूण वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते. त्यानंतर गावातून दुचाकी रॅली काढण्यात आली. तर सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री उशीरापर्यंत गावातील विविध मार्गावरून मिरवणूक नेली.