धुळे शहरासह जिल्ह्यात शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:53 IST2020-03-13T11:52:39+5:302020-03-13T11:53:02+5:30

पुतळा परिसरात रांगोळ्या काढल्या, ठिकठिकाणी प्रतिमा पूजन, मिरवणुकीने वेधले लक्ष

Shiv Jayanti celebrated in the district with the city of Dhule | धुळे शहरासह जिल्ह्यात शिवजयंती साजरी

धुळे शहरासह जिल्ह्यात शिवजयंती साजरी

आॅनलाइन लोकमत
धुळे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार गुरूवारी शहरासह जिल्ह्यात जल्लोषात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या भगव्या ध्वजामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झालेले होते. तर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेचे, पुतळ्यांचे पूजन, रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले होते. दरम्यान शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार शिवसेनेच्यावतीने जल्लोषात साजरी करण्यात आली़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले़ जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आल्याने आसमंत दुमदुमला होता़ आग्रा रोडवर भगवामय वातावरण निर्माण झाले होते़
शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आले होते. शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळपासूनच अनेकांनी अभिवादन केले़ पुष्पहार अर्पण करुन महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली़ यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, गुलाब माळी, पंकज गोरे, संदीप सूर्यवंशी, हेमंत पाटील, भूपेंद्र लहामगे, प्रफुल्ल पाटील, डॉ़ सुशील महाजन, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, राजेंद्र पाटील, देविदास लोणारी, सिध्दार्थ करनकाळ, पुरुषोत्तम जाधव, किरण जोंधळे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
सायंकाळी मिरवणूक
गुरुवारी सायंकाळी मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली़ शहराच्या विविध भागातून ही मिरवणूक नेण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भगवे फेटे बांधले होते. मिरवणुकीत शिवसैनिक सहभागी झाले होते. दरम्यान साक्रीला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Shiv Jayanti celebrated in the district with the city of Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे