शिरपूरलला ट्रकसह ४८ हजारांवर दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 13:31 IST2020-03-12T13:30:29+5:302020-03-12T13:31:09+5:30
तीन संशयितांना पकडले : हरियाणाकडून गुजरातकडे जात होता ट्रक

शिरपूरलला ट्रकसह ४८ हजारांवर दारु जप्त
धुळे : हरियाणा राज्याकडून गुजरातच्या दिशेने जाणारा ट्रक शिरपूर शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी व त्यांच्या पथकाने पकडला़ यात ३८ लाख ४० हजाराची विदेशी दारु आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण ४८ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे़ ही कारवाई चोपडा फाट्याकडून शिरपूर शहरात शहादा रोडवर करण्यात आली़ याप्रकरणी मोहम्मद शरीफ अली मोहम्मद, ईस्माईल शहाबुद्दीन खान, विनोद पुंडलिक जाधव यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे़ त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला़