महाराष्ट्र क्रिकेट संघात शिरपूरचा संमेक जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:56+5:302021-09-02T05:17:56+5:30
संमेक जगताप या क्रिकेटपटूची धुळे जिल्ह्याकडून एकमेव खेळाडू पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ वर्षे आतील ...

महाराष्ट्र क्रिकेट संघात शिरपूरचा संमेक जगताप
संमेक जगताप या क्रिकेटपटूची धुळे जिल्ह्याकडून एकमेव खेळाडू पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ वर्षे आतील संघात निवड होऊन तो पुणे येथे होत असलेल्या सराव शिबिरासाठी रवाना झाला आहे. सदर शिबिरात मागील वर्षी १९ वर्षे आतील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ३० खेळाडूंना पुणे येथील सहारा आंतरराष्ट्रीय मैदानावर शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात फिटनेस, स्पर्धात्मक सामने होऊन खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
संमेक जगताप याने मागील वर्षी आपल्या उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीचा बळावर ही संधी मिळवली आहे. यापूर्वी त्याने सतत तीन वर्षे अनुक्रमे १४ व १६ वर्षे आतील वयोगटात महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. या कालावधीत त्याने उत्तर महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषविले आहे. मागील सहा वर्षापासून शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूर येथे तो क्रिकेट खेळाचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत असून आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. संमेक हा एक उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आहे व भविष्यात त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघात खेळण्याच्या अपेक्षा तज्ज्ञांकडून वर्तविल्या जात आहे. संमेक हा महसूल मंडळ अधिकारी संजय भाऊराव जगताप यांचा मुलगा असून क्रिकेट प्रशिक्षक राकेश बोरसे, संदीप देशमुख, कुणाल गिरासे, चेतस्विनी राजपूत हे त्याला मार्गदर्शन करीत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रीतेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, मुख्याध्यापक रवी बेलाडकर, क्रीडाशिक्षक डी.बी. पाटील, अनुप चंडेल यांनी कौतुक केले़