अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शिरपूर तहसीलदारांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:11 IST2021-03-25T21:10:59+5:302021-03-25T21:11:11+5:30
निमझरी रस्त्यावरील सकाळचा प्रकार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शिरपूर तहसीलदारांची कारवाई
शिरपूर : तालुक्यातील निमझरी रस्त्यावर अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार यांनी गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पकडले़ त्यानंतर दंडात्मक कार्यवाहीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात ते जमा केले़ ही कारवाई एका गोपनीय माहितीवरुन करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील निमझरी व बोराडी शिवारातील एका नाल्यातून वाळूचा अवैध उपसा करून निमझरी रस्त्याने ट्रॅक्टरने अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार आबा महाजन यांना मिळाली़ तात्काळ पथकासह निमझरी रस्त्यावर सकाळी ते पोहचले. त्यांना सकाळी ७ वाजेच्या सुमारास सदर ट्रॅक्टर वाळूचा उपसा करतांना आढळून आल्याने ते थांबवून चौकशी केली असता सदर ट्रॅक्टरमधून अवैध वाळू उपसा व वाहतुक करतांना आढळून आले. सदर ट्रॅक्टर ताब्यात घेत तहसिलदारांनी प्रांताधिकारी कार्यालयात दंडात्मक कायार्वाहीसाठी जमा केले. ही कारवाई तहसीलदार आबा महाजन, पी़ पी़ ढोले व पथकाने केली़