शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

शिरपूर तालुका व्यसनमुक्त होण्यासाठी प्रशासनाची साथ हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:46 IST

प्रशासनाने मनापासून साथ दिली तर निश्चितच

सुनील सांळूखेप्रत्येक ग्रामीण भागात गावपुढारी, सरपंच, पोलिस पाटील, संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्यासह समाजाला पुढे न्यायावयाचे असेल तर गावात व्यसनमुक्ती जनजागृती केली पाहिजे़ मात्र तसे होतांना दिसत नाही. या संदर्भात यापूर्वी गाव पुढाऱ्यांची वारंवार बैठका सुध्दा घेतल्या आहेत. मात्र प्रशासनाने देखील साथ न दिल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे़ प्रशासनाने मनापासून साथ दिली तर निश्चितच गाव व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार काशिराम पवार यांनी व्यक्त केले.प्रश्न : शिरपूर तालुक्यात दारू, गांजाची शेती केली जाते, त्या संदर्भात काय सांगाल?उत्तर : वनजमिनीवर गांजाची शेती होत असेल तर सर्वप्रथम वनविभागाने लक्ष दिले गेले पाहिजे़ मात्र त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे गांजाची शेती होत आहे़ पोलिस कारवाईत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो, त्याप्रमाणे त्या भागातील संबंधित वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात देखील कारवाई झाली तर निश्चितच गांजाची शेती कुणी करणार नाही़ मात्र तसे होतांना दिसत नाही़ तसेच प्रशासनानेही कानाडोळा करू नये़प्रश्न : दारू व गांजामुळे ग्रामीणभागात काय परिणाम होतो ?उत्तर : बनावट दारूत स्पिरीटचा अधिक वापर केला जात असल्यास ती शरीराला हानीकारक आहे़ २० ते ४० वयोगटातील तरूणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिन झाली आहे़ त्यामुळेच शरीर काही दिवसांनी पोकळ व्हायला सुरूवात होते़ तो दुसरे कोणतेच काम करीत नाही़ त्यांचे सर्व आयुष्य दारू पिण्यातच जाते अशी परिस्थिती आहे़ कदाचित त्याचे लग्न झाले असेल तर संसार देखील उध्दवस्त होत आहे.प्रश्न : तालुका व्यसनमुक्त होण्यासाठी आपण काय उपाय योजना करीत आहेत ?उत्तर : प्रत्येक ग्रामीण भागात गावपुढारी, सरपंच, पोलिस पाटील, संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्यासह समाजाला पुढे न्यायावयाचे असेल तर गावात व्यसन मुक्ती जनजागृती केली पाहिजे़ मात्र तसे होतांना दिसत नाही़ या संदर्भात यापूर्वी गावपुढाऱ्यांची वारंवार बैठका सुध्दा घेतल्या आहेत़ मात्र प्रशासनानेही साथ न दिल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे़.प्रश्न : व्यवसनाधिनतेचा तालुक्यावर काय परिणाम होत आहे. ?उत्तर : काही वर्षापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात २० ते ४० वयोगटातील तरूण दारूमुळे किती मरण पावतात, त्यावेळी एका ग्रामपंचायत हद्दीत ५० जण मरण पावत असल्याचे उघड झाले होते़ सांगवी, कोडीद, बोराडी भागात शंभरावर मरण पावल्याचे निर्देशनास आले़ लग्न झालेल्यामुळे त्या भागातील त्या महिला देखील विधवा झाल्यात़ आहेत.भविष्यात काय उपाययोजना करणार आहात ?खास करून स्पिरीटपासून तयार केलेली बनावट दारू पिवू नका अशी जनजागृती कायम आदिवासी भागात केली जाईल़ सुखी व चांगले जीवन जगवायचे असेल तर व्यसनमुक्ती होणे अपेक्षित आहे़ सर्वांनीच चांगले जीवन जगले पाहिजे, एकटा सुखी राहून काही उपयोगाचा नाही़ स्पिरीटच्या दारूमुळे कुणाचा संसार उध्दवस्त होत असेल तर हा व्यवसाय वा धंदा कुणी करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ बनावट दारूपासून खूप पैसा कमवतो आहे, मात्र आपण दुसºया मारतो आहे.भविष्यात काय उपाययोजना करणार आहात ?खास करून स्पिरीटपासून तयार केलेली बनावट दारू पिवू नका अशी जनजागृती कायम आदिवासी भागात केली जाईल़ सुखी व चांगले जीवन जगवायचे असेल तर व्यसनमुक्ती होणे अपेक्षित आहे़ सर्वांनीच चांगले जीवन जगले पाहिजे, एकटा सुखी राहून काही उपयोगाचा नाही़ स्पिरीटच्या दारूमुळे कुणाचा संसार उध्दवस्त होत असेल तर हा व्यवसाय वा धंदा कुणी करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ बनावट दारूपासून खूप पैसा कमवतो आहे, मात्र आपण दुसºया मारतो आहे.

टॅग्स :Dhuleधुळे