शिरपूर पटेल कॉलेजची जागृती जाधवला ९१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:52+5:302021-08-26T04:38:52+5:30
आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र पदवी विभागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा ...

शिरपूर पटेल कॉलेजची जागृती जाधवला ९१ टक्के
आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र पदवी विभागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा निकाल १०० टक्के लागला. त्यात पदवी अभ्यासक्रम संगणकशास्त्र विभागातील जागृती जाधव हिने ९१.३८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शुभम निकुंभ ८९.७० द्वितीय तर अश्विनी सनेर ८९.१३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला.
गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आर.सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरु डॉ.के.बी. पाटील, प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.एम. पाटील व डॉ.आर.डी.जाधव यांनी कौतुक केले.
याकामी संगणक विभाग प्रमुख प्रा.बी.एस.पंचभाई, प्रा.एस.डी.मोने, प्रा.ए.जे.माहेश्वरी, प्रा.डी.ई.चव्हाण, प्रा.मेघा सोनवणे, प्रा.पुजा हजारे, प्रा.गीतांजली पाटील, गणेश सोनार, संजय मोरे, बन्सीलाल चौधरी, दशरथ पटेल, संदेश राजपूत, मेहुल गुजराथी यांचे सहकार्य लाभले़