Shirpur industrialist Tapanbhai Patel killed in an accident | शिरपूरचे उद्योगपती तपनभाई पटेल अपघातात ठार

Dhule

लोो न्यू्यू्यू्य्यू्यू््यू्यू्यू्य्यू्यू : शिरपूर बालाजी नगरीचे उद्योगपती तथा येथील नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती तपनभाई मुकेशभाई पटेल हे सावळदे निम्स कॅम्पसमधून घराकडे येत असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ दुभाजकाला ठोकल्या गेल्यामुळे जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. या अपघातात गाडीचा पुढील भाग चक्काचूर होवून गाडीचे दोन्ही चाक निखळले गेले आहेत. माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या पुतण्या होता. त्यांची अंत्यविधी आज संध्याकाळी 5 वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात सोशल डिस्टन सोडून केली जाणार आहे३० रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास हा अपघात महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक असलेला टोलनाक्यासमोरील हॉटेल गॅलेक्झीसमोर हा अपघात झाला.उद्योगपती तपनभाई पटेल हे आपल्याकडे आलेल्या गेस्टला सोडविण्यासाठी महामार्गावरील सावळदे येथील मुकेशभाई पटेल कॅम्पसमध्ये सोडविण्यासाठी गेले होते. ते सोडवून भरधाव वेगाने परत येत असतांना महामार्गावरील हॉटेल गॅलेक्झीसमोर दुभाजकाला ठोकल्यामुळे गाडीचा पुढील भाग चक्काचूर होवून पुढील दोन्ही चाके निखळून पडले. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे गाडी रस्त्याच्या विरूध्द दिशेला जावून आदळली. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

शिवसेनेचे माजी खासदार स्व़मुकेशभाई पटेल यांचा तो मुलगा होता. माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा तो पुतण्या होता.

Web Title: Shirpur industrialist Tapanbhai Patel killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.