राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी शिरीष पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:32+5:302021-07-29T04:35:32+5:30
२२ रोजी धुळे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ही निवड जाहीर करण्यात आली़ ...

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी शिरीष पाटील
२२ रोजी धुळे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ही निवड जाहीर करण्यात आली़ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पक्षाचे धुळे जिल्हा निरीक्षक अर्जून टिळे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा नेते डॉ़ जितेंद्र ठाकूर, शहराध्यक्ष डॉ़ मनोज महाजन, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, विधान सभा अध्यक्ष दिनेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश गरूड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष धीरज सोनवणे, युवकचे तालुकाध्यक्ष आशिष अहिरे, रमाकांत पाटील, संभाजी पाटील, मनोहर पाटील, रमेश पाटील, रामकृष्ण महाजन, माजी अध्यक्ष प्रशांत पाटील, परेश दोरीक आदी उपस्थित होते़
तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते़ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवशी शिरीष पाटील यांची या पदावर वर्णी लागली़ शिरीष पाटील यापूर्वी शिंगावे गावाचे सरपंच होते़ गेल्या जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ते तत्कालीन काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात अवघ्या २१ मतांनी पराभूत झाले होते़