भंगार इमारतीमधून बनले चकाचक पोलीस स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:38 IST2020-12-20T21:37:04+5:302020-12-20T21:38:10+5:30

साक्री : आवारात फुलविला बगिचा

A shiny police station made of rubble | भंगार इमारतीमधून बनले चकाचक पोलीस स्टेशन

भंगार इमारतीमधून बनले चकाचक पोलीस स्टेशन

साक्री : वर्षानूवर्ष धूळखात पडलेले भंगार सामान इमारतीची झालेली दुरावस्था यांचे नशिब उजळले असून साक्री पोलीस स्टेशन आता चकाचक झाले आहे़ इमारतीच्या बाहेर सुंदर बाग फुलविण्यात आली असून पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्यास बाके उपलब्ध करून देण्यात आली आहे.
साक्री पोलीस स्टेशनला नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी संपूर्ण साक्री पोलीस स्टेशन व आवार स्वच्छ करुन घेतला आहे़ पोलीस स्टेशनची इमारत नवी असूनही तिला भग्नावस्था प्राप्त झाली होती़ दिनेश आहेर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर साक्री पोलीस स्टेशनचे रुपडे पालटण्यासाठी पुढाकार घेतला़ पोलीस स्टेशनच्या परिसरात अनेक वर्षापासून जप्त केलेली वाहने ही भंगार झाली होती़ त्यामुळे परिसराला अवकळा प्राप्त झाली होती़ यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत सर्वच वाहने एका ठिकाणी व्यवस्थित लावून घेतले आहेत़ तसेच इमारतीच्या बाहेर आकर्षक फुलझाडांची भाग फुलवण्यात आली आहे़ आजूबाजूला ही वृक्ष लागवड केली आहे़ यामुळे प्रथमदर्शन साक्री पोलीस स्टेशनच्या आवारात प्रसन्न वाटते़ भंगार टाक्यापासून आकर्षक कचराकुंड्या बनवण्यात आल्या आहेत़ यासोबतच साक्री पोलिस स्टेशनचे दप्तर ही अपडेट करण्यात आले आहे़

Web Title: A shiny police station made of rubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे