शिंदखेड्यात शिक्षकांनी मांडला पगारासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 17:52 IST2018-09-01T17:50:57+5:302018-09-01T17:52:31+5:30

स्टेट बँकेत झाले आंदोलन : पैसे मिळाल्याने आंदोलनाचा समारोप

Shindekheed teachers organized stages for salaries | शिंदखेड्यात शिक्षकांनी मांडला पगारासाठी ठिय्या

शिंदखेड्यात शिक्षकांनी मांडला पगारासाठी ठिय्या

ठळक मुद्देशिंदखेडा स्टेट बँकेत शिक्षकांनी मांडला ठिय्यातब्बल ६ तासानंतर पगार मिळाल्याने आंदोलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील एज्युकेशन संस्थेचे एमएचएसएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, गल्स स्कूल शिंदखेडा येथील शिक्षकांनी स्टेट बँकेच्या शाखेतच पगारासाठी ६ तास ठिय्या मांडला़ सायंकाळी त्यांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्यानंतर ठिय्या आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ 
शिक्षकांचे वेतन स्टेट बँकेच्या शिंदखेडा शाखेतून होत असते़ गेल्या दोन महिन्यांपासून बँक व्यवस्थापकाच्या आडमुठे धोरणामुळे शिक्षक पगारापासून वंचित होते़ शनिवारी अचानक शिक्षकांनी एकत्र येऊन बँकेतच पगारासाठी ठिय्या मांडला होता़ हे आंदोलन सायंकाळपर्यंत सुरुच होते़ तब्बल सहा तास आंदोलन केल्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर पगाराचे पैसे आल्यामुळे शिक्षकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले़ 

Web Title: Shindekheed teachers organized stages for salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे