शिमला मिरचीचे बियाणे निघाले बोगस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:28 IST2020-07-04T21:28:33+5:302020-07-04T21:28:54+5:30
संडे अँकर । फळधारणा न झाल्याने साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

dhule
धुळे : शिमला मिरचीचे बियाणे बोगस निघाल्याने फळधारणा झाली नाही़ त्यामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी बियाणे कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़
साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील सुशीलाबाई काशिनाथ पाटील, लोटन रामदास पाटील, नानाभाऊ रामदास पाटील यांनी गुरूवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ सटाणा येथील भवानी अॅग्रो सर्वीसेस येथून त्यांनी इंन्झा नेमा लाईट हे शिमला मिरचीचे वाण खरेदी केले होते़ नागपूरच्या बालाजी नर्सरीमध्ये रोपे तयार करुन ९ मार्चला शेतात शेड नेटमध्ये लागवड केली़ परंतु दोन महिन्यानंतरही पिकाची प्रगती दिसली नाही़ याबाबत कंपनीचे प्रतिनिधी समीर शेलार यांच्याकडे वेळोवेळी भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली़ परंतु त्यांनी शेतावर भेट न देता उडवाउडवीची उत्तरे दिली़ याबाबत कृषी अधिकाºयांकडे तक्रार केली़ त्यानंतर तापमान आणि रोगराईमुळे पिक आले नसल्याचा बेजबाबदार खुलासा कंपनीने केला आहे़
नुकसान भरपाईची मागणी
मिरची पिकास लागणारी खते, पिक संरक्षण, फवारे, पाणी देवून योग्य निगा राखली़ योग्य पध्दतीने पिक पोषण करुन सुध्दा मिरची पिकास दोन महिने झाले तरी फुले लागली नाहीत़ काही झाडांना दोन ते तीन फुले लागली़ त्यांचा आकार अतीशय लहान होता़ मे अखेरपर्यंत फळधारणा झाली नाही़ एका शिमला मिरचीचे वजन १४० ग्रॅम येते असा दावा कंपनीने केला होता़ परंतु पिक आले नाही़ पिकासाठी दीड ते दोन लाख रुपये आधीच खर्च झाला आहे़ कृषी सेवा केंद्राची उधारी आहे़ त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़
कृषी विभागाचा पंचनामा
कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात जावून पंचनामा केला आहे़ फळांची वाढ असमाधानकार व निकृष्ट दर्जाची आढळून आली़ अंदाजे २५ ते ३० मेट्रीक टन उत्पन्न अपेक्षीत असताना शेतकºयांना कोणतेही उत्पन्न मिळाले नाही़ कंपनीने शेतकºयांना योग्य ती माहिती दिली नसल्याने नुकसान झाल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे़ उपविभागीय कृषी अधीकार बी़ व्ही़ बैसाणे, शास्त्रज्ञ आऱ व्ही़ कडु़ सी़ के़ ठाकरे, एस़ आऱ गावीत, आऱ एम़ नेतनराव यांनी पंचनामा केला़