हनुमंतपाडा येथे शिक्षण सेतु अभियानास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:35+5:302021-07-16T04:25:35+5:30
त्याअनुषंगाने अनुदानित आश्रम शाळा, सामोडे येथील मुख्याध्यापक पी. व्ही. जगताप व प्राचार्य झेड. एम. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शरद ...

हनुमंतपाडा येथे शिक्षण सेतु अभियानास सुरुवात
त्याअनुषंगाने अनुदानित आश्रम शाळा, सामोडे येथील मुख्याध्यापक पी. व्ही. जगताप व प्राचार्य झेड. एम. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शरद सूर्यवंशी, दीपक अमृतकर, राकेश पगारे, बन्सीलाल बहिरम, तुषार नेरकर, शरद मोहिते व प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी त्यांना नियुक्त केलेल्या हनुमंतपाडा ता. साक्री या गावात मिळालेल्या यादीप्रमाणे विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून आज शिक्षण सेतू अभियानाचे उद्घाटन करून सुरूवात केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंतपाडा येथील सरपंच बन्सीलाल धर्मा भोये, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीसपाटील सापटू खरबा बागुल, महाळू गणशा गांगुर्डे, गुलाब चमारू बागुल, छोटीराम सोनू साबळे, धाकल्या बुधा चौधरी हे उपस्थित होते. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र सोनवणे यांच्याकडून मिष्ठान्न चाॅकलेटचे तर सर्व शिक्षकांकडून बिस्किट पुड्यांचे मा. सरपंच, पोलीसपाटील व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
प्रा. राजेंद्र सोनवणे व राकेश पगारे यांनी शिक्षण सेतू अभियानाचा हेतू याप्रसंगी समजावून सांगितला.
शरद मोहिते, दीपक अमृतकर, बन्सीलाल बहिरम, तुषार नेरकर, राकेश पगारे यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक गीतांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सूर्यवंशी यांनी केले. राकेश पगारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी व गावातील बहुसंख्य नागरिक समाज मंदिरात उपस्थित होते.