म्हसदी सरपंचपदी शैलजा देवरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:34+5:302021-02-17T04:42:34+5:30
सरपंच व उपसरपंच निवडीसाठी सोमवारी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा झाली. यावेळी सरपंचपदासाठी एस.टी.महामंडळाचे विभाग प्रमुख ...

म्हसदी सरपंचपदी शैलजा देवरे बिनविरोध
सरपंच व उपसरपंच निवडीसाठी सोमवारी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा झाली. यावेळी सरपंचपदासाठी एस.टी.महामंडळाचे विभाग प्रमुख राजेंद्र देवरे यांच्या पत्नी शैलेजा राजेंद्र देवरे, तर उपसरपंचपदासाठी माजी सरपंच व अनुदानित आश्रम शाळेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत पंडितराव देवरे यांची नावे सुचविण्यत आली. दोन्ही उमेदवारांचा एक-एक अर्ज आल्याने, सरपंच, उपसरपंचाची निवड बिनविरोध झाली. निवड बिनविरोध होताच, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य नरेंद्र आत्माराम देवरे, किरण शिवाजी देवरे, प्रवीणबानो प्यारेनब मन्सुरी, विष्णू देवराम गायकवाड, सुनील शालिग्राम पवार, रेखाबाई अशोक सोनवणे, ज्योती बाळू ठाकरे, सुंदरबाई दौलत देवरे, विजय देविदास देवरे, वनमाला रत्नाकर बागुल, अशोक तुळशीराम मोहिते, रंजना निंबाजी देवरे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी यु.के. पावरा यांनी काम पाहिले, तर तलाठी एस.टी. कदम, ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे, ग्रामसेवक दिनेश बोरसे, कोतवाल बापू अहिरे लिपिक रवींद्र देवरे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश खैरनार, भूषण चव्हाण, सचिन मोहिते, सिद्धार्थ मोहिते, प्रवीण देवरे, विजय देवरे आदींनी सहकार्य केले. सरपंच, उपसरपंचासह नवनिर्वाचित सदस्यांचा गटनेते व पॅनलप्रमुख चंद्रकांत देवरे, माजी सदस्य गंगाराम देवरे, राजेंद्र देवरे व एस.एन. देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर, ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.