सावळदे पूल ठरतोय ‘डेथ पॉर्इंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:17 IST2020-06-25T12:16:53+5:302020-06-25T12:17:19+5:30
शिरपूर : पुलावर दिवस-रात्री असते वाहनांची वर्दळ, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवावेत

dhule
सुनील साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : देशातील चौथ्या क्रमांकाचा असलेला मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावर वाहनांची प्रचंड वाहतूक असते. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतूक सुलभ झाली. परंतु या महामार्गावर सावळदे गावानजीक तापी नदीचे अथांग पात्र असून त्यावर मोठा पूल उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या या पुलाची ओळख ‘डेथ पॉर्इंट’म्हणून होऊ लागली आहे. या पुलावरून आतापर्यंत तीनवेळा तापी नदीपात्रात पडली आहेत. त्यामुळे चालक-सहचालकाला जलसमाधी मिळाली आहे. तर आजपर्यंत अनेकांनी या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुलावरून वाहन कोसळणार नाही तसेच आत्महत्येसाठीही कोणी या पुलाचा वापर करणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग सुरूवातीला दभाशी-सुकवद-गिधाडे गावाजवळून जात होता़ या मार्गावर गिधाडे गावाजवळ ब्रिटीशकालीन दगडी पूल बांधण्यात आला आहे़ तापीला महापूर येत असल्यामुळे पूलावरून पाणी वाहत असे, त्यामुळे अनेकदा मार्गावरील रहदारी ठप्प होत होती़ तसेच सुलवाडे बॅरेजचे काम झाल्यामुळे तेथे पाणी अडवायला सुरुवात झाली़ त्यामुळे नवीन उंच पूल सावळदे गावाजवळ बांधण्यात आला़ परंतु गिधाडे गावाजवळील ब्रिटीशकालीन पुलाची दुरवस्था तशीच राहिली. या पुलाचे बांधकाम १९२६ मध्ये सुरू होऊन १९३३ मध्ये पूर्ण झाले होते़