सात जणांना कोरोनाची लागण, मृत्यू एकही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:54+5:302021-02-05T08:45:54+5:30
जिल्हा रुग्णालय येथील ८८ अहवालांपैकी एकही अहवाल पाॅझिटिव्ह आलेला नाही. तर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात आज दिवसभरात एकही बाधित ...

सात जणांना कोरोनाची लागण, मृत्यू एकही नाही
जिल्हा रुग्णालय येथील ८८ अहवालांपैकी एकही अहवाल पाॅझिटिव्ह आलेला नाही. तर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात आज दिवसभरात एकही बाधित आढळला नाही. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील ३१ अहवालांपैकी ४ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात संदीपनी कॉलनीत दोन, आदर्श नगरात १, दादुसिंग कॉलनीत १ तसेच रॅपिड टेस्टच्या १ अहवालापैकी एकही बाधित आढळला नाही.
साक्री भाडणे येथील सीसीसी मधील ३५ अहवालांपैकी एकही अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. तसेच रॅपिड टेस्टच्या २ पैकी एकही पाॅझिटिव्ह नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १० अहवालांपैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आहे. यात नंदुरबार येेथील दाेन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एसीपीएम लॅबमधील ६ अहवालापैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. साक्री तालुक्यातील फोफरे येथील एकाचा समावेश आहे. खासगी लॅबमधील ९ अहवालापैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. धुळे तालुक्यातील नेर येथील एकाचा बाधितांमध्ये समावेश आहे.