आणखी आठ जण पॉझिटिव्ह; धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झाली ५६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:07 IST2020-05-11T20:02:04+5:302020-05-11T20:07:18+5:30

रूग्णांची संख्या पोहचली ६० वर

Seven more positive patients were found | आणखी आठ जण पॉझिटिव्ह; धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झाली ५६

dhule

धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात दोन धुळे जिल्ह्यातील व सहा जण भांडुप (मुंबई) येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले होते. मात्र भांडुपचे सहा नसून पाचच रूग्ण आहे. तर उर्वरित तीन  धुळे जिल्ह्याचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ५६ झालेली आहे.

दरम्यान  सोमवारी रात्री वैद्यकीय महाविद्यालय उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित दोन महिलांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यात धुळे तालुक्यातील नगावबारी येथील ४० वर्षीय महिला व शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या आठ झालेली आहे.

Web Title: Seven more positive patients were found

टॅग्स :Dhuleधुळे