मेंढ्यांसाठी चारा छावण्या उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:33 IST2020-06-16T21:32:59+5:302020-06-16T21:33:26+5:30
युवा मल्हार सेना : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

dhule
धुळे : मेंढपाळांच्या गावांजवळ मेंढ्यांना चरण्यासाठी चारा छावण्यांची निर्मिती करावी अशी मागणी मेंढपाळ बांधवांनी केली आहे़
युवा मल्हार सेनेच्या नेतृत्वाखाली मेंढपाळांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निदर्शने केली़ लॉकडॉनमुळे मेंढपाळांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ लॉकडाऊनमुळे इतर गावात अडकलेल्या मेंढपाळ बांधवांना मुळे गावात परत जाण्यासाठी शासनाने मदत करावी, कोरोनाच्या संसर्गामुळे मेंढपाळांना गावात येण्यास मज्जाव केला जात असल्याने फिरत्या रेशन कार्डची सोय करावी, नैसर्गिक आपत्ती तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मेंढ्यांची नुकसान भरपाई मिळावी, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़
मागण्या त्वरीत मान्य केल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे़
निवेदनावर युवा मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, धनराज सरग, कैलास गर्दे, संजय सरग, दिपक बोरसे, मनोज पिसे, सागर शेळके, विनोद धनगर, भिला कोळेकर, मनोज कोळेकर, राज धनगर, विक्की धनगर, संदिप बोरकर, शिवदास कारंडे, ज्ञानेश्वर कोळेकर, रमेश वाघमोडे, कृष्णा थोरात, गोपीनाथ देवकाते, प्रवीण निळे, रोहित धनगर, प्रमीत शिंदे, बबलू गरदरे, किशोर हटकर, समाधान धनगर, सुनील बच्छाव, आबा व्हडगर, रुपेश धनगर, अरविंद धनगर, भूषण धनगर, वैभव धनगर आदींनी केली आहे़
जिल्हाध्यक्षांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गामुळे भटक्या मेंढपाळांना गावातून हाकलून लावण्याच्या घटना दुर्दैवी आहेत़ त्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलण्याची गरज आहे़