सर्व्हर डाऊन! लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बसावे लागले ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST2021-03-05T04:35:44+5:302021-03-05T04:35:44+5:30
पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात फ्रंटलाईन ६०० पेक्षाही जास्त कोरोना योद्धांना पहिला तर दुसरा डोस १६० नागरिकांना देण्यात आली. ...

सर्व्हर डाऊन! लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बसावे लागले ताटकळत
पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात फ्रंटलाईन ६०० पेक्षाही जास्त कोरोना योद्धांना पहिला तर दुसरा डोस १६० नागरिकांना देण्यात आली. तर जेष्ठ नागरिक लसीकरणांच्या टप्प्यात येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम लसीकरण जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक पी.एस. शिंदे यांनी लस घेतली. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा जेष्ठांची नोंदणी होत असल्याने अडचणी आल्या. तसेच उशिराने ४५ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेतले. तसेच गावाचा विस्तार पाहता जेष्ठांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी लसीकरणासाठी असलेल्या नर्स यांनाच माहिती नोंदणी करून लसीकरण करावे लागते, अनेक जेष्ठ नागरिक यांची नाव नोंदणी करतांना तांत्रिक अडचणी येत असल्याने या ठिकाणी जेष्ठांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तर नाव नोंदणीसाठी एका तज्ज्ञ संगणक ऑपरेटरची गरज आहे. ज्यामुळे जलद गतीने नोंदणी होऊन जेष्ठ नागरिकांना लवकर लस मिळेल. तरी स्थानिक आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. तर ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे यांनी अनेक जेष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी नोंद करून त्यांना लस टोचून घेण्यास मदत केली.
जेष्ठ नागरिक विविध ॲपवरून नोंदणी करीत आहेत. तर काही व्यक्तींकडे मोबाइल नाही, अशाही अडचणी येत आहेत. शहरात मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक असल्याने आता लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे, तरी कॉम्प्युटर ऑपरेटर यांची संख्या वाढून लसीकरण वाढविण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढणार असल्याने या अडचणी समस्या त्वरित सोडवण्याची मागणी होत आहे.