जामनेर पुरवठा कार्यालयात रंगलेल्या ओली पार्टीमुळे खळबळ

By Admin | Updated: February 19, 2015 13:10 IST2015-02-18T23:54:20+5:302015-02-19T13:10:04+5:30

महाशिवरात्रीच्या दिवशीच तळीरामांनी कार्यालयातच रिचवली दारु

Sensation due to oly party in the Jamner Supply Office | जामनेर पुरवठा कार्यालयात रंगलेल्या ओली पार्टीमुळे खळबळ

जामनेर पुरवठा कार्यालयात रंगलेल्या ओली पार्टीमुळे खळबळ

महाशिवरात्रीच्या दिवशीच तळीरामांनी कार्यालयातच रिचवली दारु
जामनेर : ज्या तहसिल कार्यालयाला विनंत्या आर्जव करुन तालुक्यातील ३० ते ४० गावांच्या महिलांनी, पुरुषांनी संपूर्ण दारुबंदीची मागणी वेळोवेळी केली, त्याच कार्यालयातील पुरवठा विभागात सकाळी, सकाळी चक्क रम, व्हिस्कीच्या बाटल्या सापडून आल्या. विशेष म्हणजे ज्या रात्री हा मद्यसेवनाचा प्रकार झाला असेल त्यादिवशी तर महाशिवरात्र हा उपवासाचा दिवस होता. त्याचमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तहसील कर्मचार्‍यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज (१८) सकाळी पुरवठा कार्यालयातील कर्मचारी नेहमीप्रमाणे साफसफाई करण्यासाठी कार्यालयात गेला. तेथे टेबलावर बिसलेरी पाण्याच्या खाली बाटल्या, चखण्यासाठीचे पदार्थ आदी रम आणि व्हिस्किच्या दहा-बारा बाटल्या मिळून आल्या. या घडलेल्या प्रकाराची कार्यालयीन आवारात चर्चा सुरू झाली.
कार्यालयाच्या चाव्या चार जणांकडे...
पुरवठा विभागाच्या कार्यालयाच्या चाव्या चक्क दोन नाही तर चार जणांकडे असल्याचे सांगण्यात आले. एवढे महत्त्वपूर्ण कार्यालयाच्या चाव्या एक दोन माणसांऐवजी चार ते पाच जणांकडे कशासाठी ठेवण्यात आल्या याचेही आ›र्य होत आहे. कारण पुरवठा विभागाच्या कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे असता, त्याचवेळी आता नवीन कार्ड बनविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याशिवाय स्वस्त धान्य दुकानदारांसंबंधीचा अहवाल, त्याविषयीचे कागदपत्रे आदी अनेक महत्त्वपूर्ण अशी शासकीय आणि सार्वजनिक मालमत्ता याच कार्यालयात असून काही विपरीत घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार ही सुद्धा प्रश्न आता शहरवासीय विचारू लागले आहेत. यापूर्वीही तहसील आवारात बिअर आणि दारूच्या बाटल्या मिळून आल्या होत्या तेव्हा कसे तरी प्रकरण मिटविण्यात आले. आज पून्हा महाशिवरात्री या पवित्र दिवशीच्या रात्रीच तळीरामांनी मोठ्या प्रमाणात मद्य रिचवून आपली भूक आणि उपवासाला वाट मोकळी करुन दिली असावी असेही उपहासात्मक शहरात चर्चा सुरू आहे.
- माझ्या कानावर घटनेची माहिती आली आहे, सुटीचा दिवस असल्याने आर.एस.माळी पुरवठा निरिक्षक........काही कर्मचारी रात्री काम करत होते. कोण अधिकारी, कर्मचारी वा स्वस्त धान्य दुकानदार पण त्यांनी काही केल्याचे म्हटले आहे. यामध्ये सामील होता याची माहिती व चौकशी सुरू आहे, या प्रकारात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर आणि कर्मचारी अधिनियमनाखाली कडक कारवाई करण्यात येईल. -चंद्रकांत देवगुणे, तहसीलदार जामनेर.
कॅप्शन...जामनेर- तहसील आवारातील पुरवठा विभागाच्या कार्यालयात साफसफाई करताना मिळालेल्या दारूच्या बाटल्या.

Web Title: Sensation due to oly party in the Jamner Supply Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.