धुळे महापालिकेत नगरसेवकाची वरिष्ठ अधिकाºयास शिविगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:13 IST2018-03-06T17:13:23+5:302018-03-06T17:13:23+5:30

अधिकाºयांनी पुकारले कामबंद आंदोलन, आयुक्तांना निवेदन

Senior corporator's senior officer in Dhule municipality gets angry | धुळे महापालिकेत नगरसेवकाची वरिष्ठ अधिकाºयास शिविगाळ

धुळे महापालिकेत नगरसेवकाची वरिष्ठ अधिकाºयास शिविगाळ

ठळक मुद्दे- जिल्हा नगरोत्थान योजनेतील कामांवरून वाद- कार्यकारी अभियंत्यांच्या तक्रारीनंतर अधिकाºयांचे कामबंद- हाताला काळी फित बांधून घडलेल्या घटनेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा नगरोत्थान योजनेत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांच्या तांत्रिक मंजूरीवरून मनपाचे कार्यकारी अभियंता बी़जी़भोई यांना शिवसेनेचे नगरसेवक संजय गुजराथी यांनी शिविगाळ केल्याची घटना मंगळवारी घडली़ या घटनेनंतर दुपारी अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले होते़
महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी़जी़भोई यांच्याकडे जिल्हा नगरोत्थान योजनेतील कामांची फाईल प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करण्यात आली होती़ मात्र त्यांनी संबंधित फाईलला महासभेच्या ठरावाची प्रत जोडण्यास सांगितले़ प्रत जोडल्यानंतरही काही त्रुटी सुचविण्यात आल्याने नगरसेवक संजय गुजराथी व कार्यकारी अभियंता बी़जी़भोई यांच्यात वाद झाला़ हा प्रकार सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला़ त्यानंतर दुपारी भोई यांनी त्याबाबतची तक्रार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केल्याने अधिकाºयांनी लागलीच कामबंद आंदोलन पुकारले़ सर्व अधिकाºयांनी हाताला काळी फित बांधून आयुक्तांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला़ तर दुसरीकडे नगरसेवक संजय गुजराथी यांनी मात्र आपण भोई यांना शिविगाळ केली नसून केवळ जाब विचारल्याचे सांगितले़ आपल्या प्रभागातील रस्त्यांची कामे जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत सादर केली असून ती कामे मार्गी लावण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचेही गुजराथी म्हणाले़


 

Web Title: Senior corporator's senior officer in Dhule municipality gets angry