१११७ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:35 IST2020-03-07T22:35:10+5:302020-03-07T22:35:52+5:30

सातवा वेतन आयोग : राज्यातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागु करण्याची प्रक्रिया सुरूवात

 Send the proposal of the employees to the Ministry | १११७ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविणार

dhule

धुळे : जिल्हा परिषद, महापालिका, नगर पालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग गतवर्षी लागु केला होता़ या वेतन आयोगाचा लाभ मनपाच्या १ हजार ११७ कर्मचाºयांना होणार आहे़ त्यासाठी शुक्रवारी नगर विकास विभाग मंत्रालयात या कर्मचाºयांची माहिती पाठविण्यात येणार आहे़
राज्य सरकारी कर्मचाºयांना १ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे़ हा वेतन आयोग लागु झाल्यास महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या १ हजार ११७ कर्मचारी तसेच सेवानिवृत झालेल्या कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ अखेरची सातव्या वेतनाची थकबाकी रक्कम समान पाच हप्यात द्यावी लागणारी आहे़ त्यामुळे दरमहा अंदाजे ७५ लाखांपेक्षा अधिकचा बोजा मनपाच्या तिजोरीवर पडणारा आहे़ यापुर्वी कर्मचाºयांना ५ व ६ वेतनाचा लाभ देतांना मनपाची आर्थिक ओढाताण झाली होती़
कार्यरत १११७ कर्मचारी
मनपाच्या विविध शाखेतील १ हजार ११७ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यात अ गटातील शासन मंजूर पदे ५६ भरलेली पदे १० तसेच रिक्त पदे ४६ आहेत़ ब गटातील शासन मंजूर ३८ , भरलेली ६ रिक्त ३२, क गटात शासन मंजूर ६५६, भरलेली २२४, रिक्त ४३२ तसेच ड वर्गात शासन मंजूर ११२४ भरलेली १११७ तसेच रिक्त पदे ११५७ आहेत़ अशी सध्या २ हजार २७४ शासन मंजूर पदे, १ हजार ११७ भरलेली पदे तर १ हजार १५७ रिक्त पदे आहेत़ त्यापैकी १ हजार ११७ कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त काही कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ यंदा लवकरच दिला जाणारा आहे़
कर्मचाºयांची माहिती पाठविली
सातवा वेतन आयोगाचा लागु झाल्यानंतर मनपाला त्या कर्मचाºयांना फरक पाच टप्यात द्यावी लागणार आहे़ त्यासाठी मनपाकडून कार्यपुर्व नियोजन करण्यात आले आहे़ कर्मचाºयांनी संख्या, आस्थापनावर येणारा खर्च, महापालिकेला मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न अशी माहिती देण्यात आली आहे़
असा होता कर्मचाºयांवर खर्च
महापालिकेचा आस्थापना एकूण वार्षिक खर्च १४९.१५ कोटी रूपये आहे़ त्यात कर्मचाºयांवर सुमारे ८८.७२ कोटी रूपये वार्षिक खर्च होतो़ तर मालमत्ता कर, मोबाईल टॉवर, वस्तु व सेवा कर तसेच इतर कराव्दारे महसुल सुमारे १७३.६९ कोटी महापालिकेला वार्षिक मिळतो़ त्यामुळे आस्थापना खर्च व मिळणारा महसुलद्वारे पाच टप्यात कर्मचाºयांना फरक देता येईल़

Web Title:  Send the proposal of the employees to the Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे