रंधे शाळेतील ६ खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:08 IST2018-12-14T22:08:07+5:302018-12-14T22:08:35+5:30

शिरपूर : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेकरीता

Selection of six players from Randhe School | रंधे शाळेतील ६ खेळाडूंची निवड

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील डॉ़विजयराव रंधे इंग्लिश मेडिअम स्कूलमधील ६ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे़ त्यासाठी ते पुणे येथे होत असलेल्या स्पर्धेकरीता रवाना झाले़
पुणे जिल्ह्यातील फुरसंगी येथे १५ ते १७ डिसेंबर दरम्यान ३५ वी सबज्युनियर महाराष्ट्र राज्य हँडबॉल अजिंक्यपद राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे़ त्यासाठी धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्यावतीने झालेल्या निवड चाचणीत जिल्ह्यातील संघात किसान विद्या प्रसारक संस्थेच्या डॉ़विजयराव व्ही रंधे इंग्लिश मिडियम स्कूलचे विदयार्थी जुनेद खान, प्रितेश भदाणे, साई पाटील, वरूण गिरासे, तेजस देवरे, अंकित खाटीक यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली.
१४ रोजी निवड झालेले विद्यार्थी रवाना होण्यापूर्वी संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे यांनी त्यांचा गुलाबपुष्ण देवून गौरव केला़
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, खजिनदार आशाताई रंधे, सचिव निशांत रंधे, विश्वस्त रोहित रंधे, संचालिका हषार्ली रंधे, समन्वयक प्रा़जी़व्ही़पाटील, प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार यांनी कौतुक केले. याकामी प्रशिक्षक हरीश सोनवणे, क्रीडा शिक्षक प्रमोद पाटील, शितल चव्हाण यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection of six players from Randhe School

टॅग्स :Dhuleधुळे