स्काऊटस् राज्य पुरस्कारासाठी पाच विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:12 IST2020-03-20T15:12:06+5:302020-03-20T15:12:41+5:30
तºहाडी : साहेबराव सोमा पाटील विद्यालयाचे यश

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
तºहाडी : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडस् या संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरातून येथील सोमा पाटील विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हस्ती भवन दोंडाईचा येथे १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत राज्य पुरस्कार चाचणी शिबिर आयोजित केले होते. यात तºहाडी येथील आण्णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालयाचे पाच विद्यार्थी बसले होते. यात दिनेश योगेश बागुल, कुणाल सुभाष पाटील, कल्पेश प्रमोद परदेशी, गोविंदा बाला पावरा, जिग्नेश अशोक सोनवणे यो स्काऊटस् विद्यार्थ्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे . याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, उपाध्यक्ष निंबा नथु भामरे, सचिव विजय भामरे, सुभाष भामरे, मुख्याध्यापक एन.एच. कश्यप, शिक्षकांनी कौतुक केले.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना स्काऊट शिक्षक डी.बी. पाटील व ए.एम. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.