अ.भा.प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात कार्यकारिणी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:58 IST2019-07-30T11:57:59+5:302019-07-30T11:58:17+5:30
जैताणे : अध्यक्षपदी पाटील, सरचिटणीसपदी बच्छाव बिनविरोध

अधिवेशनात बिनविरोध निवडीनंतर विनोद पाटील व प्रकाश बच्छाव यांचा सत्कार करताना सी.एन.देसले. सोबत अन्य पदाधिकारी.
जैताणे : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साक्री तालुका त्रैवार्षिक अधिवेशन येथील रामरावदादा आश्रम शाळा येथे नुकतेच उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी अ.भा.प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार सुरेश भावसार अध्यक्ष होते. यावेळी साक्री तालुका कार्यकारिणी निवड झाली. अध्यक्षपदी विनोद नथ्थू पाटील, साक्री यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश बच्छाव, निजामपूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष भगवंत बोरसे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग.स. बॅँकेचे माजी चेअरमन सी. एन. देसले, साक्रीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, राज्य समन्वयक वसंत देवरे, राज्य उपाध्यक्ष भगवान पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहन बिस्नारिया, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, डॉ.प्रा. रवींद्र ठाकरे उपस्थित होते.
यावेळी जैताणे, निजामपूर परिसरातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ.पंकज जाधव, वैभव देवरे, अरुण कुवर यांचा समावेश होता. यावेळी विविध प्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली. शंकर कोकणी, दीपक मोरे, सुनील जाधव, पावबा बच्छाव, केवबा बच्छाव, योगेश हालोर, भालचंद्र कुवर, प्रकाश देवरे, छोटू सोनवणे, किशोर वाघ, गुलाब पवार, सतीश नांद्रे, गणेश न्याहळदे, दिपक कुवर, उद्धव भामरे, वसंत तोरवणे, संगीता जाधव, सरला चन्ने, सुनिता सोनवणे, गणेश बोंबले, दिनेश भोसल, विजय न्याहळदे, दीपक मोरे यांनी परिश्रम घेतले.