अभ्यास दौऱ्यासाठी ८ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:34 IST2020-03-06T12:33:40+5:302020-03-06T12:34:11+5:30
थाळनेर स्कूलचा उपक्रम : अमेरिकेतील शालेय अभ्यासक्रमाचा करतील अभ्यास

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील गोधात्मा शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था संचलित इलिट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे एक अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांची शोळेमार्फत आयोजित केलेल्या पात्रता चाचणीमध्ये आठ विद्यार्थ्यांची अमेरिकन अभ्यास दौºयासाठी निवड करण्यात आली.
निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्राची पाटील दहावी, करण जैन दहावी, अनुष्का पाटील नववी, रेणुका मांडलिक नववी, प्रगती पाटील आठवी, हर्षदा धनगर आठवी, कल्याणी निळे सातवी तर, चेतन मांडलिक सातवी यांचेसोबत शाळेचे प्राचार्य प्रमोद पाटील यांचा समावेश आहे.
हा चमू अमेरिकेतील प्राथमिक व माध्यमिक शालेय अभ्यासक्रम, शैक्षणिक पद्धती, व्यवस्थापन यांचा अभ्यास करतील जेणेकरून याचा उपयोग भारतीय शिक्षण व्यवस्थेत होईल. १९ फेब्रुवारी रोजी शाळेचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांनी अमेरिकन कॉन्सुलेटची व्हिसा प्राप्त करण्याची मुलाखत पहिल्या प्रयत्नात यशस्विरित्या पार पाडली. संस्थेचे अध्यक्ष छगन तेले, सचिव अविनाश तेले यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील वर्षी एका वर्षासाठी विद्यार्थ्यांना अमेरिका येथे अभ्यासदौºयासाठी पाठविण्याचा व अमेरिकेतील विद्यार्थी आमच्या शोळेत एक वर्षासाठी अभ्यास दौºयाला येऊन भारतीय शैक्षणिक पद्धती जागतिक स्तरावर नेण्याचा संस्थेचा मानस आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. यशस्वितेसाठी प्राचार्य अशफाक पठाण, व शिक्षकांनी प्रयत्न केले.