वडदे सरपंचपदी सीमा भिल, उपसरपंचपदी माधुरी कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST2021-02-16T04:36:30+5:302021-02-16T04:36:30+5:30
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनील चित्ते, राजेंद्र बन्सीलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रवीण किसन ...

वडदे सरपंचपदी सीमा भिल, उपसरपंचपदी माधुरी कोळी
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनील चित्ते, राजेंद्र बन्सीलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रवीण किसन चित्ते उपस्थित होते.
निवडणूक निर्णायक अधिकारी भीमराव गरुळ यांना ग्रामसेवक महेंद्र थोरात व तलाठी दीपक भगत यांनी व ग्रामपंचायत शिपाई राकेश निकुंभ यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आला. गेल्या ४५ वर्षांपासून वडदे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत असल्याची परंपरा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात वडदे गावाने कायम ठेवली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, छोटू पाटील, मंगेश पवार, सर्जेराव पाटील, कल्याण बागुल, शिवसेना तालुका प्रमुख गिरीश देसले, सागर देसले शहर प्रमुख, विश्वनाथ पाटील, चेतन राजपूत, पांडुरंग चित्ते, दयाराम चित्ते, ज्ञानेश्वर बागुल, निंबा सौंदाणे, संभाजी चित्ते, संजय चित्ते, महेंद्र सावळे,तुंबा सौंदाणे, योगेश चित्ते, दिलीप चित्ते, सतीलाल चित्ते, प्रल्हाद बागुल, देवेसिंग भिल, छोटू महाले, किशोर कोळी, राजेंद्र भिल्ल, अजय जाधव, अशोक चित्ते, काशिनाथ चित्ते, प्रतापसिंह देशमुख, दरबारसिंग देशमुख, खुशाल चित्ते, संदीप सावळे, देवेसिंग देशमुख,सुनिल चित्ते, स्वप्नील चित्ते, जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.