सचिव खोटे प्रोसिडींग लिहितात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:46+5:302021-03-27T04:37:46+5:30
ते म्हणाले.दोंडाईचा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या विषयावर मतदान घेण्यात आले. हा ठराव ३६ विरूद्ध १४ मतांनी पारित झाला. एकूण ...

सचिव खोटे प्रोसिडींग लिहितात
ते म्हणाले.दोंडाईचा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या विषयावर मतदान घेण्यात आले. हा ठराव ३६ विरूद्ध १४ मतांनी पारित झाला. एकूण सदस्य ५६ असतांना उपस्थितांची बेरीज ५२ होते. चार सदस्य तटस्थ होते का,असा सवाल उपस्थित केला. तसेच प्रोसिडींगमध्ये सूचक, अनुमोदक यांची नावेही बदलली जातात असा आरोप करीत हा अध्यक्षांनाच अडचणीत आणण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ ग्रामपंचायतीचे काम रखडलेले आहे. ग्रामपंचायतीच्या कामावर आतापर्यंत २ लाख रूपये खर्च झालेला आहे. विकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी यावेळी केली.
कोरोनाचा प्रश्न गाजला
दरम्यान जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे पडसाद या सभेत उमटले. खरदे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा नसून ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी एका महिला सदस्येने केली. दरम्यान हाच मुद्दा धरून सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी कोरोनाची स्थिती मांडली. ते म्हणाले शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ हे गाव हॅाटस्पॉटझालेले आहे. याठिकाणी आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झालेला आहे. निमगूळसह इतरही ठिकाणी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने दक्ष राहण्याची नितांत गरज आहे. ज्या गावामध्ये सर्वाधिक रूग्ण आढळत आहे, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली.
दरम्यान १ एप्रिल पासून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपकेंद्रामध्ये लसीकरणाची सोय केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी दिले.